मुळात हे सगळे टोमणे का ऐकायला मिळतात ?
दलित समाजाचा विकास झाला नाही म्हणून ? तो का नाही झाला ? इतर मागास वर्गीयांचा झाला मग दलित समाजाचा विकास का नाही झाला ? मुळात इतर समाजाचा दलित समाजावर काही राग आहे का ? मग कशासाठी इतके टोमणे ? हे टोमणे आहेत की दलित समाजाचे किंवा त्यांच्यामुळे निर्माण झालेले प्रश्न हा एक गोंधळ माझ्या मनात आहे ?
१.'हे' आता चौपाटीची घाण करणार (अनंत चतुर्दशीचे काय?)
कुठला त्रास जास्त हे तिथले रहिवाशी ठरवतात. आता या पैकी कुठलाही त्रास शक्य
नाही कारण यावेळी प्रशासनाने दोन्ही वेळेस काळजी घेतली.
( कदाचित इतर समाजाने दलित समाजावर आणि दलित समाजाने इतर समाजावर मारलेल्या टोमण्यांचा हा बदल असेल. )
२. ओपन मध्ये ऍडमिशन मागून आमची सिट खातोय..."
हा आरक्षणाचा राग. काही जण ते घेत नाही, काही जण शिक्षण अर्धवट सोडतात
तर काही जण तिथपर्यंही पोहचत नाही. आरक्षण नक्की कोणासाठी मग त्या जागेची
किंमत कोण मोजणार तर इतर समाजातली माणसं.या बाबतीत कुलकर्णी साहेबांच
मत पट्त.
३. विकीसाहेबांचे एक मत येथे द्यावेसे वाटते
आणि मी तर बऱ्याच जणांच्य तोंडातुन ऐकले आहे की लग्न कोणाशीही करीन पण ह्या समाजातील पोरिंशी करणार नाही
इथे मुलगा असो वा मुलगी इतर समाजातले दलित समाजात सहजासहजी द्यायला तयार होत नाही याला जवाबदार कोण इतर समाजाची मानसिकता का दलित समाज ?
बऱ्याच मराठी हौसिंग सोसायट्यांत तर दलितांना घर घ्यायचे असेल तर त्यांना प्रवेश नाही.
यालाही जवाबदार कोण ? दलित समाजाकडे इतर समाजाचा बघण्याचा दुष्टीकोन
का दलित समाज ?
4. ज्याप्रमाणात आरक्षण हवं त्याचप्रमाणात दलित समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि बौद्ध धर्माचे विचार घेतात का ?
मी ह्या टोमणे मारणाऱ्यांच्या बाजूने नाही आणि दलित समाजाच्या बाजूनेही नाही.
पण हे सगळ थांबायला हव. हे टोमणे कसे बंद होतील आणि दलित समाजाबद्दल
लोकांचा दुष्टीकोन कसा बदलेल ? त्यासाठी दुसऱ्या समाजाने काय करायला पाहीजे
आणि दलित समाजाने काय करायला पाहिजे ?