कविता आवडली. छान आहे.
ओळींच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे १, ३ आणि ४ या कडव्यांमध्ये वेगळीच मजा आली आहे. जसे -
तारकांच्या माळा घालुनी साजऱ्या, नभामध्ये माझ्या चांद तुझा असे वाचल्यास एक अर्थ लागतो; आणि तारकांच्या माळा नभामध्ये माझ्या, घालुनी साजऱ्या चांद तुझा असे वाचल्यास एक वेगळा अर्थ लागतो. गंधाळला वारा वाहे रानोरानी, माझ्या ध्यानीमनी प्रीत तुझी असे वाचले तर एक अर्थ लागतो; आणि गंधाळला वारा माझ्या ध्यानीमनी, वाहे रानोरानी प्रीत तुझी असे वाचले, तर वेगळाच अर्थ लागतो. २ आणि ५ मध्येही असेच परिणाम साधता आले असते, तर आणखी मजा आली असती. असो.
तारकांच्या माळा घालुनी साजऱ्या
नभामध्ये माझ्या चांद तुझा
हे विशेष आवडले.