लिखाळ, तुमचे म्हणणे खरे आहे.
मात्र क्रूड ऑईल, पेट्रोलीयम, डिझेल, पेट्रोल, नॅचरल गॅस इत्यादी पदार्थांना उचित मराठी पारिभाषिक शब्दकोष सर्वज्ञात होण्याची गरज आहे. ही वस्तुस्थितीच जरी ह्या लेखमालेने अधोरेखित झाली तरी पुरेसे कार्य साधले असे मी मानेन.
ह्यासंदर्भात मराठीत 'तेलाचे जग' हे सुरेश परांजपे ह्यांचे अभ्यासपूर्ण पुस्तक आदित्य प्रकाशनाने १९९२ सालच्या गणेशचतुर्थीस प्रसिद्ध केले. केवळ रु.६०/- किंमतीचे हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. ह्यात एक छोटासा शब्दसंग्रहही दिलेला आहे.