प्रभाकर, आजवर आपले विचार इतर सदरांमध्ये मनोगतावर वाचत आले आहे. ही कथा एक अप्रतिम कथा आहे. आपले अचूक निरीक्षण, मनाची संवेदनशीलता, ओघावती भाषा यामुळे आपण विषय खूप प्रभावीपणे मांडला आहे. कावळ्याच्या या गोष्टीतून माणसाची आणि पक्षांची, छोट्या पिलापासून सुरुवात करून जीवनाच्या विविध पायर्‍या चढताना आपल्या पिलाची काळजी घेतानाही ,आपल्या जीवाभावाच्या माणसाला न विसण्याची जी वृत्ती आपण दाखवलेली आहे ती एक आदर्श आहे. अशा माणुसकीचे दर्शन जर आपल्याला वारंवार होत राहणे ही आज गरजेची गोष्ट आहे. जीवनातली मूल्ये आणि सत्ये आपण अचूक दाखवली आहेत. मला अजुनही बरेच सांगायचे आहे , प्रतिसाद मी अधिक वेळ मिळाल्यावर जरून वाढवेन. ही एक अप्रतिम ओघावती बोधपर कथा आत शंका नाही. आपले लेखन असेच बहरत राहो, सोनाली