महाराष्ट्र टाइम्समधील लेखात वर्णन केलेल्या समस्येचे संभाव्य कारण अभूतपूर्व आणि सकृत्‌दर्शनी अविश्वसनीय  आहे.  या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी निष्पक्ष आणि हुशार रसायनशास्त्रज्ञ, धातुशास्त्री आणि वैज्ञानिकांची एक समिती नेमून सखोल संशोधन करावे.  संशोधनांती प्रक्रिया न केलेला कचरा हे कारण आढळल्यास योग्य ती उपाययोजना  आणि भविष्यात घ्यावयाची काळजी यांचा विचार करता येईल.