आता याला चर्चा म्हणता येईल.
१.हो माझं ही तेच म्हणणं आहे इतर समाज तुमच्या कडे बोट दाखवणार आणि तुम्ही इतर समाजाकडे. इतर समाज शिवाजी पार्कच उदा. देणार मग तुम्ही कधी नाशिकच कधी अनंत चतुर्दशीचे. याने झालं काय शेवटी. पुन्हा लिहितो आहे.
आता या पैकी कुठलाही त्रास शक्य नाही कारण यावेळी प्रशासनाने दोन्ही वेळेस काळजी घेतली.( कदाचित इतर समाजाने दलित समाजावर आणि दलित समाजाने इतर समाजावर मारलेल्या टोमण्यांचा हा बदल असेल. )
यात पहिलं वाक्य अस लिहिलं की कुठला त्रास जास्त हे तिथले रहिवाशी ठरवतात. कारण मी हे ऐकून होतो. या बाबतीत तुम्ही दिलेली माहिती वाचून मतपरिवरर्तन ठीक आहे पण दोन्ही समाजाकडून याचे समर्थ होऊ नये असे ही वाटते. मग माझं किंवा इतर समाजातल्यांच मतपरिवर्तन झालं म्हणून त्याची किंमत तिथल्या रहिवास्यांनी आणि इतर समाजाने मोजावी का ?मग ते नाशिक मधले असो किंवा शिवाजी पार्क मधले.
आणि चुकीच आहे ते चुकीचंच आहे याबद्दल धन्यवाद विकीसाहेब कारण मी इतर मागासवर्गीयामध्ये येतो. अस बोलण्याचा आणि लिहिण्याचा निदान मला तरी हक्क नाही.या एका वाक्यासाठी मी माफी मागतो.
पण बाकीच्या मतांच काय ? ती तर माझी नाहीत.
याला चर्चा म्हणता येईल का ? इ. मा.वर्गाचा विकास कसा झाला यावरून तुम्हांस काय बोलायचे. इ.मा.वर्ग आणि दलित यांतील फरक शोधा पण विचारपूर्वक.
जे लिहायचे ते स्पष्ट लिहा कदाचित माझ्या समाजात बदल घडवण्याची कल्पना तुमच्याकडून मिळेल. आणि विकास कसा झाला या विषयी काय चर्चा करायची.विकास झाला हे महत्त्वाच ना. या दोन्ही समाजात काही फरक आहे या विषयी चर्चा नको कारण सध्या इतर मागासवर्ग ही आरक्षण मागतो आहे मग आपली चर्चा भरकटेल.
तुम्ही दिलेल्या माहिती मध्ये हे ही वाचण्यास मिळाल. आता याला ही जवाबदार कोण ?
रिपब्लिकन पक्षामधील फाटाफुटीबाबत जनतेत तीव्र असंतोष आहे. प्रत्येक नेत्याचा राजकीय व्यवहार वेगवेगळ्या कारणांसाठी जनतेच्या नाराजीचे कारण आहे. रिपब्लिकन नेत्यांमध्ये सर्वाधिक जनाधार असलेले नेते म्हणून खासदार रामदास आठवले यांचे नाव घेतले जाते; मात्र गेल्या काही वर्षांत आठवले यांनी सत्तेच्या वर्तुळात राहण्यासाठी केलेल्या लटपटींबद्दल रिपब्लिकन जनतेमध्ये कमालीचा राग आहे. ज्याला संधी दिली तो समाजाची अस्मिता गुंडाळून व्यवहाराचे राजकारण करतो आणि बाकीचे सत्तेजवळ जाता येत नाही म्हणून नको त्या पक्षांशी पडद्यामागे हातमिळवणी करतात! रिपब्लिकन जनतेत असलेला हा राग हिंसाचाराच्या रूपाने व्यक्त झाला, असे सर्वसाधारणतः मांडले जात आहे. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी हे राजकीय सोय म्हणून रिपब्लिकन पक्षाचे आमदार आहेत. कलानी आणि त्यांच्या पत्नी ज्योती कलानी स्वतःला "आंबेडकरांचे अनुयायी' म्हणून निवडणुकीचे राजकारण करतात तेव्हा निर्नायकी समाजातील हतबलता आणखी वाढते. वेगवेगळे रिपब्लिकन पक्ष थाटून बसलेले नेते निवडणुकीच्या वेळी उमेदवारी देताना जे व्यवहार करतात ते गेल्या निवडणुकीपासून ओंगळवाण्या स्वरूपात जनतेसमोर येऊ लागले आहेत. ६ डिसेंबरदरम्यान चैत्यभूमीवर फिरताना तरुणांमध्ये आपल्या नेत्यांच्या या राजकीय व्यवहाराबद्दल प्रचंड चीड दिसत होती. दर वर्षी तिथे होणाऱ्या वेगवेगळ्या गटांच्या राजकीय सभांना जी गर्दी दिसत असे ती या वेळी नव्हती. त्याचेही कारण हेच होते.