बहुतेक सर्वच जण आरक्षणाच्या विरोधात. आरक्षण लागू झाले भारत प्रजासात्ताक राष्ट्र म्हणून उद्यास आल्यावर पण त्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणी लगेच झाली नाही. त्यासाठी कित्येक वर्षे जावी लागली. कारण तिथे समितीवर बसणारे कोण होते तर सवर्ण अधिकारी. त्यामुळे घटनेने जरी आरक्षण लागू केले असले तरी ते मिळवण्यासाठी दलितांना झगडावे लागलेच. माझ्या मते बहुतेकांना हेच वाटते की आरक्षण हे फक्त धर्मांतरीत बौद्ध समाजालाच मिळते.

निनाद तुम्ही आरक्षणची टक्केवारी काढताय दलित समाजाला आरक्षण फक्त १४ टक्के(नक्की आठवत नाही पण टक्केवारी कमी आहे) आहे. त्या टक्क्यांमध्ये बौद्ध,चर्मकार,मांग,व इतर ही अनेक जाती येतात.त्यामुळे इथेही स्पर्धा आहे.उलट इ.मा.वर्गाला आरक्षण जास्त आहे पण इ.मा.वर्गात अनेक जातींचा समावेश असल्याने इथेही स्पर्धा आहे.

चर्चा मुळ मुद्दा सोडून आरक्षणावर घसरली इथे कोणाची मानसिकता दिसली.

आपण या विषयाबाबत व्यवस्थित विचार करून लिहावे ही इच्छा.

निनाद तुम्हाला वाटत ओबीसी समाज जितका दलित समाजाशी संपर्कात आला तितका इतर समाज नाही. यासाठी ओबीसी समाजाला इतर समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दुष्टिकोन मिळाला. आणि हा दुष्टीकोन बदलण्यासाठी दलित समाजाला फारसं यश मिळाल नाही. असे तुम्हाला वाटतेय पण हे चुकिचे आहे. विचार करा.

आपला

कॉ.विकि