निनाद राव यांसी,
तुम्ही आरक्षणाच्या विरोधात लिहील्याने मला तुमच्याबद्दल असे लिहावे लागले आणि ते तुमच्या मनाला लागले. आपण आता व्यवस्थित विचार करून लिहू लागला आहात..पण समाजाच्या समस्या तुम्हाला माहीत नाही आहेत. आणि माझ्याच्याने त्या लिहीवत नाहीत. मला तुम्हाला परत सांगावेसे वाटते कि एक दोघांचा उत्कर्ष पाहून समाज सुधारला यांना आरक्षण नाही दिले गेले पहीजे अस म्हणण चुकीचे आहे .तुम्हाला तरी किती माहित होत इ.मा.वर्गाला किती टक्के आरक्षण आहे ते.अहो आत्मपरीक्षण समाजाचे करा. इ.मा.वर्ग समाज हा पहिल्यापासून (काही जाती सोडून)पुढारलेला होता.त्यांनी दलितांना नेहमीच दुषणे दिली आहेत. तुम्ही समाजात मिसळा तुम्हास आपोआपच कळेल खर कोण खोट कोण. तुम्हाला बहुधा कळणार नाही त्यासाठी तुम्हास आरक्षण द्वेषातुन बाहेर पडावे लागेल. तुम्ही इतक्या लवकर माघार घेवू नका. आम्ही आत्मपरीक्षण केले आहे म्हणूनच हा सामाजिक विषय लिहीला. त्याला तुम्ही बहुमोलाची साथ लिहीलीत त्या बद्दल आपले मन:पुर्वक आभार.
आपला
कॉ.विकि