अंधेरीचे लोखंडवाला संकुल, बांगूर नगरचा काही भाग (वसंत कॉंप्लेक्स), माईंडस्पेस, रायन इंटरनॅशनल स्कुल ते मालवणी व चारकोप-गोराई हे भाग निसर्गाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बनवण्यात आलेले आहेत.
खाडीच्या मुखावरील खारफुटीची जंगले तोडून व खाजणीच्या जमीनीवर भराव टाकून हा भाग बनवण्यात आला आहे.
खारफुटीच्या जंगलांचे (पर्यावरणाच्या दृष्टीने) महत्त्व हे काही मंडळींकडून निक्षून सांगूनही त्याकडे दुर्लक्षच केले गेले.
त्याचेच हे दुष्परिणाम !
निसर्ग बदला घ्यायचा तो घेणारच-
भरडले कोण जातेय ह्याच्याशी निसर्गाचे काय देणे घेणे !
किंबहूना मानवजातच ह्याला कारणीभूत असल्याचे निसर्गाचे मत असल्यास....... चुकीचे ते काय ?