हिंदी आणि इंग्रजीचे उत्तम ज्ञान नसल्याने मराठीभाषक सैन्यात व इतर केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये अत्यल्प दिसतात.
मराठी भाषिक सैन्यात आहेत- अत्यंत उच्च दर्जावर मराठी मंडळी आहेत !
हम्म् - आपली अपेक्षा असेल की "जवान" मंडळी मराठी असावीत तर त्याला माझा तात्त्विक विरोध आहे-
मराठी मंडळींनी हलकी सलकी कामे करण्यापेक्षा अत्यंत उच्च स्थानाकडे लक्ष केंद्रित करावे व हलकी सलकी कामे इतर वर्गीयांसाठी "मोकळी" ठेवावीत-
ज्यांना फायनान्स किंवा मॅनेजमेंट मधले काही कळते- ते माझ्या ह्या आग्रही मुद्द्याचे सदैव समर्थन करतील !
" बी फायनॅन्शीयली स्टाँग; अदर्स वील ओबे यु !!!"
आजच्या युगात ब्रुसली व्हायचे की बिल गेटस व्हायचे हे विचारल्यास मी "बिल गेटस" म्हणेन !

इतर केंद्र सरकारी नोकऱ्या-
ह्यांत "आय.ए.एस." वगळल्यास कोण सर्वात महत्त्वाचे आहे ?
आय ए एस साठी मराठी उमेदवाराने प्रयत्न करायलाच हवे ह्या मतांचा मी ही आहे !
सरकार व सरकारी यंत्रणे वर पूर्णपणे नियंत्रण ठेवणारी हीच एक जमात आहे त्याबद्दल दुमत नाही-

अशा उच्चाराच्या मराठी पाट्या जागोजाग दिसतील.
महाराष्ट्रातले / मराठीतले रंगकर्मी (हलकी कामे करणारे) कमी झालेले दिसताहेत. ; )
महाराष्ट्रातला कुठलाही अशिक्षितही ह्या पेक्षा चांगले मराठी लिहू शकेल-
पुणेकर मात्र काहीही "पाट्या" टाकू शकतात हे मान्य ! 

माधवराव कुलकर्ण्यांचे मराठी उत्तम आहे हे सर्व जाणतात, मुद्दाम आवर्जून सांगायची गरज नाही.
माफ करा "शुद्ध मराठी" सर......
माझे आडनाव आपण व्यवस्थित लिहा ! (अन्यथा अनुल्लेखाने "उल्लेख" करा ! )
आपले मराठी अशुद्ध आहे हे मला माहीत आहे....
त्याचे पुरावे देण्यासाठी माझ्या नावाचा "असा" उल्लेख करायची आवश्यकात: नाही !
आपणांस (असल्यास !) एखादे नांव असेल-
त्या नावाचा (?) उल्लेख मी विचित्र रितीने केल्यास आपणांस आवडेल का.... ह्याचा जरा विचार करा.
लहान तोंडी मोठा घास घेतलाय.... आमच्या / आपल्या पचनी पडल्यास उत्तम !
धन्यवाद !

संस्कृत आमच्या शाळेत शिकवले जात नसे- पुढे जाऊन ते शिकण्याची आवश्यकता भासली नाही;
आपण ७० साली भेटलो असतो तर बरे झाले असते असेच आता वाटू लागले आहे ! 

माझे हिंदीचे ज्ञान किती अपुरे आहे हे मला तेव्हा कळाले.
हरकत नाही; स्वतःतले अवगुण कळले तेच महत्त्वाचे !

या सुमाराला महाराष्ट्रात काय परिस्थिती होती? 
माहीत नाही..... माफ करा; आपल्या लेखनावरून आपल्या वयाचा अंदाज आला नाही......
आपण अत्यंत ज्येष्ठ असाल; माझ्या लेखनात कुठेही आपला अवमान झाल्या असल्यास प्रांजळपणे मी माफी मागतो !
परंतु चर्चांच्या मुद्द्यांत मी ज्येष्ठ कनिष्ठ हा भेदभाव मानत नाही हे सांगणे न लगे !

सीबी‌एस्‌सी(सेंट्रल बोर्ड)ला मराठी नाही असे माधवरावांना कुणी सांगितले?
पाचशे पंचावन्न शाळा दाखवून देतो.....  नाहीतर मिशी उतरवून फिरेन !
वाद आहे तो महाराष्ट्रात सेंट्रल बोर्डच्या शाळांना मराठी अनिवार्य असावे की नसावे ह्याबद्दल !
महाशय..... आपण विषय भरकटू इच्छिताहात !

महाराष्ट्राचा एस्‌एस्‌सीचा दर्जा सीबी‌एस्‌सीच्या पासंगालापण पुरणार नाही!! 
हो आपल्या सारखी "शुद्ध मराठी" मंडळी आमच्या आसपास वावरत असल्यास अजून काय होणार ???

आपल्याही प्रतिउत्तराची अपेक्षा आहेच !