दोन दिवसांपूर्वी मी आपणाला काही प्रश्न विचारले होते, आरक्षणाच्या संदर्भात, आपली संदिग्ध मते जाणण्यासाठी. अजून आपणापैकी एकानेही त्याची दखल घेतली नाही. नंदकिशोर कदाचित इतरस्त्र कामात व्यग्र असावेत, पण त्यांनी जेव्हा सवड मिळेल, त्याप्रमाणे प्रतिसाद द्यावा.
पण एव्हढ्या सगळ्या अवधीत, विकिंनी निनादांबरोबर आरक्षणावरून बरीच चर्चा चालवली आहे, अगदी 'मंडल अहवाल वाचून या...' वगैरे सांगेपर्यंत. त्यांच्या नजरेत माझे प्रश्न नक्कीच पडले असणार. तेव्हा त्यांनी त्यांचे निराकरण लवकरच करावे, अशी रास्त अपेक्षा मी बाळगतो.
प्रदीप