इथे टिचकी मारा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1862617.cms

दलित समस्या या आहेत.मी आरक्षणाच्या विरोधात नाही पण तुमच्या समाजाचा विकास करण्यासाठी आरक्षणाची मदत आहे आणि त्याचा वापर तुमच्या समाजाचा विकास होण्यात होत नाही म्हणून विरोधात आहे. दलित समाजाचा राजकारणातल्या लोकांनी जास्त वापर केला हे महत्त्वाचे.

निनाद राव,तुम्हाला ना कधी डॉ. आंबेडकर कळणार ना त्यांचे कार्य. आपले काही प्रतिसाद पाहून दुःख झाले.धन्यवाद

शेवटी लिहील ना आत्मपरीक्षणाची गरज आहे.

 ( पुन्हा आरोप प्रत्यारोप याला अंत नाही )

त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार दलित समाजा पर्यंत पोहचले तरी भरपूर .

 ५० वर्षांनंतर ही दलित समाज बौद्धमय झाला का ?

मूर्ती पुजा करू नये, व्यसने करू नये, हिंसा करू नये आणि किती तरी चांगल्या गोष्टी आणि विचार आहेत ना मग ते का नाही घेत.

मला वाटत करा स्वतःचा विकास करा मग ते आरक्षण घेऊन करा, डॉ. आंबेडकरांचे विचार आणि त्यांचे कार्य डोळ्यासमोर घेऊन करा, बौद्धमय विचार घेऊन करा. पण करा. स्वतःच्या विकासासाठी मग इतरांना जवाबदार धरू नका .

तुमच्या समाजावर अन्याय होतो तर त्याला जवाबदार कोण. ते न होण्यासाठी तुमचा समाज काय करतो. मोठ्या हुद्द्यावर असल्यावर जर टोमणे ऐकवत नाही तर या सगळ्यातून दलित समाजाला कस बाहेर काढता येईल ते महत्त्वाच वाटत.

नंदकिशोर साहेब जर तुमच्या बरोबर दलित समाजाचा हि तितकाच विकास झाला तर कोणाची हिंमत होईल अस बोलण्याची आणि अन्याय करण्याची. दलित समाजाचा विकास जो पर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या समाजातल्या एका दोघांना हे ऐकावा लागेल.हे ऐकावा लागत म्हणून तुम्ही तुमच्या नेत्यांना तितकंच जवाबदार धरता का ?

या बोलणाऱ्यांची तोंड कशी बंद होतील त्यासाठी माझे हे मत.

दलित समाजाच्या विकासासाठी मी इतकाच विचार करू शकतो. माझ्यासाठी हा विषय

संपला आहे हे लिहायचं राहून गेल.