मला वाटते तुम्ही माझे एकूण प्रतिसाद वाचून तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती किंवा एका अंदाजापर्यंत तुम्ही पोचले असता. तर असो.

१). आरक्षण गेली कित्येक दशके चालू आहे. त्याने दलित समाजाचा किती फायदा झाला, असे आपणास वाटते? फारसा झाला नाही, असे आपले मत असल्यास तसे का?

उत्तर : बहुतेक सर्वच जण आरक्षणाच्या विरोधात. आरक्षण लागू झाले भारत प्रजासात्ताक राष्ट्र म्हणून उद्यास आल्यावर पण त्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणी लगेच झाली नाही. त्यासाठी कित्येक वर्षे जावी लागली. कारण तिथे समितीवर बसणारे कोण होते तर सवर्ण अधिकारी. त्यामुळे घटनेने जरी आरक्षण लागू केले असले तरी ते मिळवण्यासाठी दलितांना झगडावे लागलेच. माझ्या मते बहुतेकांना हेच वाटते की आरक्षण हे फक्त धर्मांतरीत बौद्ध समाजालाच मिळते. त्यामूळे अजुन म्हणावा इतका फायदा झाला नाही. इथे  फायधाचा प्रश्न येतोच कुठे आरक्षण हे हजारो वर्षे गुलामगिरीत असणाऱ्या समाजाचा विकास करण्यासाठी आहे. अजून बराच विकास व्हायचा आहे. त्यासाठी समाजात मिसळावे लागेल. 

म्हणून परत परत लिहावेसे वाटते की एका दोघांचा उत्कर्ष पाहून संपुर्ण समाज अर्थिक,सामजिक,सांस्कृतिक दृष्ट्या सुधारला असे म्हणणे चुकीचे आहे.

बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर लगेचच दोन महिन्यांनी बाबासाहेबांचे निधन झाले. त्यामुळे बाबासाहेबांना अत्यंत कमी वेळ भेटला .त्यांच्या निधनाने समाज पोरका झाला. त्यांच्यानंतर समाजाला आवश्यक नेते मंडळी न भेटल्याने, तसेच अन्य अनेक कारणांनी अजूनही समाजाचा म्हणावा तसा विकास झाला नाही.

२. आरक्षण अजून किती काळ चालू ठेवावे, असे आपणास वाटते?

उत्तरे: सरकारने यासाठी एक समिती बसवावी त्यातुन जो काय निष्कर्ष निघेल त्यानुसार आरक्षण असावे. समितीत काम करणारे जातीयवादी नसावे.

३. आरक्षणाचा भाग (quota) अजून वाढवल्याने काय फायदा होईल दलित समाजाचा?

उत्तर: आरक्षणाचा कोटा न वाढवता आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावे.

४. आरक्षण आहे तसेच चालवावे, का त्याच्या पद्धतीत काही बदल घडवावा? की ते संपूर्णपणे काढून टाकावे?

उत्तर: याचे उत्तरे वरिल प्रश्नांत दडलेले आहे.

मी मराठी माणूस आणि दलित मराठी असा सामाजिक विषय चर्चेसाठी घेतला त्यावर आलेल्या प्रतिसादावरून असा निष्कर्ष निघतो की या दोघांत फरक आहे. बहूतेकांना आरक्षण खुपते. मुळ विषय सोडून बहूतेक जण आरक्षणावर घसरले. दलित माणसाला नेहमीच हिणवले जाते. हिणवणारा माणूस मराठी असतो. परप्रांतिय असला तरी त्याला ह्यांचा बद्दल सांगणारा माणूस मराठी असतो. त्यामूळेच मराठी माणूस आणि दलित मराठी वेगळा आहे असे वाटते.

प्रतिसादांत सर्वांना आरक्षणाशिवाय काहीही दिसले नाही.

तेव्हा सर्वांनी उत्तर द्यावे की मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस एकच आहे की वेगळा.

पळपुट्या निनाद यांनी आधी स्वतःचे आत्मनिरीक्षण करावे मग़ समाजाचे करावे अशी त्यांना नम्र विनंती.

निनाद वैचारीक आणि मानसिक दृष्ट्या अजून महान आहे असा निष्कर्ष त्यांच्या प्रतिसादावरून काढायला हरकत नाही.

आपला

कॉ.विकि