वरील ७ एप्रिलला लिहिलेल्या प्रतिसादात एकदोन चुका अनवधाने राहून गेल्या; चुका सुधारून मजकूर वाचावा अशी विनंती. बाळासाहेब खेर मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री होते, चुकून 'महाराष्ट्राचे' लिहिले गेले. शेवटच्या परिच्छेदात 'परीक्षे'तल्या 'री'ची वेलांटी विसरली, तरी वेलांटी घालून घ्यावी.
आणखी एक सांगायचे होते. आमच्या बीजगणिताच्या प्रश्नपत्रिकेत ३० गुणांचे अंकगणित असे. मुंबई-पुण्यात घेतल्या जाणाऱ्या एस्एस्सीच्या परीक्षेत हा विषय नव्हता.
स्थूलवाचनासाठी आम्हाला दोन पुस्तकांचा विकल्प होता. एक 'इंडिया पास्ट अँड प्रेझेंट' आणि दुसरे मिनू मसानींचे 'अवर इंडिया'. पहिले पुस्तक छान असले आम्हाला रूक्ष वाटे. बहुतेक विद्यार्थी 'अवर इंडिया' घेत. या पुस्तकांचा अभ्यास घरी करावा लागे. आठवड्यातून एकदा एका तासाला शिक्षक त्यावर चर्चा घडवून आणत आणि शंकासमाधान करीत.