इथे फ़रक एवढाच की श्रीरामानी मारिचला अगोदरच ओळखल होत. फ़क्त सीतेच्या हट्टासाठी त्याना मारिचाकडे जावे लागले.
थोडी गफलत होते असे वाटते. मूळ वाल्मिकि रामायणानुसार सुवर्णमृग मरिच असावा अशी शंका लक्ष्मणाने काढली कारण पृथ्वीतलावर (आणि बहुधा स्वर्गातही) अशाप्रकारचा मृग अस्तित्त्वात नाही हे तो जाणून होता, त्यामुळे हे काहीतरी मायावी कारस्थान असावे तेव्हा या फंदात पडू नये अशी सुचवणी लक्ष्मण करतो.
सीतेने हट्ट-बिट्ट केल्याचे वाल्मिकि रामायणानुसार माझ्या वाचनात आलेले नाही. लक्ष्मणाच्या सांगण्यावर चटकन विश्वास न ठेवता मृदु शब्दात ती सुवर्णमृग जिवंत पकडून आणा, तो भरताला भेट देता येईल, राजमहालाची शोभा वाढवेल असे काहीसे सांगते, सुवर्णमृग मारून आणल्यास तीक्ष्ण गवताच्या पात्यांवर बसण्यास त्याच्या कातड्याचा उपयोग होईल एवढेच सांगते. (सीता ना रागावत, ना कटकटत, ना रुसत ना फुरंगटून बसत फक्त स्मितहास्य करते.) [शब्दन् शब्द तपासलेला नाही]
उलटपक्षी, रामच सुवर्णमृगाच्या पाठी का जावे याची लंबीचौडी मिमांसा देतो, यावरून सुवर्णमृगामागे जाण्यात त्यालाही तेवढेच कुतुहल होते हे दिसते. यापैकी महत्त्वाचे २ मुद्दे म्हणजे मृगया करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे म्हणून आणि जरी सुवर्णमृग मरिच असला तरीही त्याला यमसदनास धाडण्यासाठी त्याच्यामागे गेलेच पाहिजे.
स्त्रीहट्टापायी संकटे ओढवतात ही भर रामायणात फार पुढे पडली असावी.
विषयांतराबद्दल क्षमस्व!