लोकसत्ता (लोकरंग पुरवणी) यातील जयप्रकाश पवार यांचा मराठी विरुध्द बिहारी हा लेख वाचला. यात त्यांनी बिहारी माणसाबद्दल बरेच काही लिहीले आहे. या लेखात बर्याच त्रुटी आढळल्या. बिहारमध्ये सुमारे दोन लाख मराठी राहत असतील पण मुंबईच्या दोन ,तीन उपनगरे मिळून दोन लाखापेक्षा त्यांची संख्या जास्त आहे.इथे मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्य होत चाललाय त्याच काय.बिहारिंच्या मुंबईतील वाढत जाणार्या संख्येबद्दल एकही शब्द त्यांनी या लेखात लिहीलेला नाही.
दै.लोकसत्ता नेहमीच राष्ट्रीय एकतेच्या बाजूने लिहीत आला आहे. प्रांतियवादाला,कट्टर भाषिकतेला लोकसत्ताने कधीही बढावा दिला नाही हे मान्य केले तरी आपले वर्तमानपत्र मराठी असल्याने ते वाचणारा कोण आहे मराठी भाषिक उधा मुंबईत मराठी माणूस कमी झाल्यावर दै.लोकसत्तास वाचक मिळावयास हवा आणि कोणताही मुंबईतील बिहारी मराठी वर्तमानपत्र वाचणार नाही. याचे भान ठवणे आवश्यक आहे.
आपला
कॉ.विकि