विकि,

उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद. काही प्रश्न व काही टिपण्ण्या:

१). आरक्षण गेली कित्येक दशके चालू आहे. त्याने दलित समाजाचा किती फायदा झाला, असे आपणास वाटते? फारसा झाला नाही, असे आपले मत असल्यास तसे का?

विकि:'फायधाचा प्रश्न येतोच कुठे आरक्षण हे हजारो वर्षे गुलामगिरीत असणाऱ्या समाजाचा विकास करण्यासाठी आहे. अजून बराच विकास व्हायचा आहे. त्यासाठी समाजात मिसळावे लागेल.'

अहो, फायदा म्हणजे जे काही साध्य करावयाचे होते, ते झाले की नाही, अशा अर्थाने! माझ्या 'फायदा' ह्या शब्दाच्या प्रयोजनाची अशी फोड करावी लागेल असे वाटले नव्हते! 'समाजात मिसळावे लागेल" ह्याचा मी अर्थ लावतो तो हा की 'जनतेला, ज्यांना दलितांच्याबद्दल काही कळवळा आहे अश्यांना दलितांत मिसळून काम करावे लागेल'. पण ह्या तुमच्या उत्तरात विरोधाभास आहे. हे मिसळणे वगैरे कोण करणार तर असे समाजातले लोक. आणि आरक्षण देते कोण, तर सरकार. ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत, हे आपल्या ध्यानात आले काय? म्हणजे आरक्षणाविषयई माझा जो मूळ प्रश्न आहे, त्याला हे उत्तर अजिबात बरोबर नाही!

२. आरक्षण अजून किती काळ चालू ठेवावे, असे आपणास वाटते?

विकि: 'सरकारने यासाठी एक समिती बसवावी त्यातुन जो काय निष्कर्ष निघेल त्यानुसार आरक्षण असावे. समितीत काम करणारे जातीयवादी नसावे. '

दलित समाजांत आपण वावरता, त्यांचे प्रश्न ह्या चर्चेत भाग घेतलेल्यांपैकी फक्त आपणालाच समजतात, असा आपला सूर कायम आहे, म्हणून आपणाला ह्याविषयीचे आपले मत विचारले होते. जर आपल्या निरिक्षणातून व त्यानंतर ह्या प्रश्नांच्या अभ्यासातून आपल्याला ह्याविषयी काहीच सुचविता येत नसेल, तर ती खेदाची बाब आहे. आपण फक्त मायबाप सरकारकडे बोट दाखवणार. म्हणजे आपलयाला ह्याविषयी काहीही स्वतःला म्हणयचे नाही ! हा पळपुटेपणा झाला.

३. आरक्षणाचा भाग (quota) अजून वाढवल्याने काय फायदा होईल दलित समाजाचा?

विकि: 'आरक्षणाचा कोटा न वाढवता आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावे.'

व्यवस्थित म्हणजे नक्की कशी, ह्याचा काही उलगडा केला असता तर बरे झाले असते.

विकि: 'प्रतिसादांत सर्वांना आरक्षणाशिवाय काहीही दिसले नाही.'

माझ्या प्रतिसादांत अवचटांच्या लेखाचा उल्लेख होता. खैरलांजीलाही मी स्पर्श केला होता, त्याचा आपणाला विसर पडलेला दिसतो! 

हे मान्य, की मी आपणाप्रमाणे दलितांत वावरलेलो नाही फारसा. पण मी बराच वाचतो ह्या संदर्भात. दलितांचे प्रश्न तर आपणासमोर आहेतच, पण तसेच भटक्या व विमुक्त जाती, शेतमजूर, हमाल, ओढगस्तीला आलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, एव्हढेच नव्हे, अत्यंत वाईट परिस्थितीत काम करणारे मुंबईतले पोलिस असे अनेक प्रश्न आपल्यापुढे आहेत, ते बरेच मलातरी अस्वस्थ करतात. कारण मी जरी त्यांच्यात वावरत नसलो, तरी मी त्यांच्याबद्दल वाचतो, व त्यांच्या परिस्थितीचा empathetically  विचार करू शकतो. आपणाकडे दलितांत वावरण्याचा अनुभव आहे, तर त्यांच्या प्रश्नांविषयी अधिक अभ्यास करून चर्चा करणे अधिक उपयुक्त ठरेल!

मीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे, माझ्या कुवतीनुसार वेगळ्या प्रतिसादात देईन.

प्रदीप