
मी तर अनेकदा केशवकुमार, खोडसाळ अशांनी केलेली विडंबने वाचून मग, कुठल्या प्रतिमांचे काय केले, हे पाहण्यासाठी मूळ गजल वाचतो.
विडंबने फारच मजेदार असतात.
ही कोठल्याही गजलकाराच्या अभिव्यक्तीवर खोचक टिप्पणी नाही. मला काव्य रचना जमत नसल्याने काव्य करणाऱ्यांचा मला आदरच वाटतो.
पण अनेकदा चंद्र-चांदणे, दारू, बाजार-विक्री, काफिले, सरण-मरण या प्रतिमांच्या तोचतोच पणाचा कंटाळा येतो. पण विडंबने अनेकदा वेगळ्याच कल्पनांनी सजलेली, मार्मिक आणि सुंदर असतात.
हे विडंबन सुंदरच.
आपला,
--लिखाळ.