विकि,

आपल्या ह्या उत्तरामुळे फक्त करमणूक झाली.

मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस एकच आहे की वेगळा

ह्या मूळ प्रश्नाच्या निमित्ताने आपणाला सर्वश्री प्रभाकर पेठकर तसेच मी जी उत्तरे दिली होती, ती परत एकदा नीट वाचा. भंपक उदाहरणे देउन आपण ही चर्चा चालू केलीत. त्या उदाहरणांचा प्रतिवाद केल्यावर आपण त्याविषयी गप्प बसलात. दलितांचा प्रश्न सर्व भारतव्यापी आहे, तो फक्त मराठी समाजापुरता असलेला असा नाही, हे मान्य आहे की अमान्य?

'पळपुटेपणा मी कधीही करत नाही. निनादरावांचे वकिलपत्र तुम्ही घेतले की काय.'

मी ज्या मुद्द्याबद्दल हे म्हटले, त्याबद्दल बोला. ते आपणास शक्य नाही हे उघड आहे, तेव्हा आता आपण वैयक्तिक बिनबूडाचे आरोप करत आहात. माझी करमणूक होत आहे फक्त!

'मला वाटत आपण पुडी( प्रतिसाद) सोडून नंतर गप्प बसता. आपला नेमका उद्देश काय आहे ते तरी कळू धा.'

कुठली पुडी सोडून दिली मी, व पुढे गप्प बसलो, हे नीट सांगू शकाल काय, आपण?

माझा उद्देश काय, असे आपण विचारण्यापर्यंत रागावू नका, बुवा! त्यामुळे काही साध्य होणार नाही. जरा विचार करून लिहा, जे आपण लिहिले त्याचा मुद्देसूद पाठपुरावा करा, तर चर्चेला अर्थ राहील. आणि निव्वळ बिनबूडाचे आरोप नकोत. संदर्भ द्या, व आरोप करा. नाहितर आता आपणच जी प्रशासकांच्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करता व इतर तसे करत नाहित, अशी वल्गना आपण केली होतीत, त्याला बाध यावयाचा!

...प्रदीप (नुसते असेच म्हटले तरी चालेल, 'राव' वगैरे नको).

'