विकि,
माफ करा, पण आपली आकलनशक्तिच कमी आहे, की आपण सोयिस्कर्रित्या मी गेल्या प्रतिसादात जे लिहिले, त्याचा विपर्यास करत आहात?
गेल्या प्रतिसादात आपण माझ्यावर निनादांचे नाव घेवून आरोप केलेत. मग आपण मी उगाच प्रतिसादाची पुदी सोडून देतो व गप्प बसतो असेही म्हटलेत. नंतर माझा हेतू काय ह्या चर्चेत सामील होण्याचा, असेही रागारागाने विचारलेत. माझी करमणूक झाली ती ह्या आपल्या स्वैर प्रतिसादामुळे. माझी करमणूक स्वतःहून करण्याची बरीच चांगली साधने माझापाशी आहेत, त्यासाठी आपणाशी चर्चा कशाला करायला हवी?
दलितांबद्दल कळवळा असणे ह्याला काही दलितांतच वावरले असले पाहिजे असे नाही. असे पहा, आपण दलितात एव्हढे वावरताहात असे आपण म्हणता. पण, 'तुम्हा कोणालाच काही त्यांचे प्रश्न कळत नाहीत, मला ते नीट कळतात' असे फक्त म्हणण्यापलिकडे आपण ह्या सर्व चर्चेत काय लिहिले आहे, ते आपणच स्वतः बघा. म्हणजे मी आपल्या दलितांविषयींच्या कळवळ्याविषयी कुठलाही संशय घेत नाही. पण कुणालाही चर्चा करायला, व त्याहून ठोस कार्य करायला नुस्ता वावर, व एक कळवळा उपयोगी नाही. त्यासाठी काही तर्कांची, काही अभ्यासाची जरूर आहे. माझासारखे लोक जे काही वाचनांत येईल, त्यावरच भागवू शकणार. पण आपण काय वाचायचे, व कुठल्या लिखाणाला किती महत्त्व द्यावयाचे, हे तरी तारतम्य बाळगता आले पाहिजे. तेव्हढे मला आहे असे मी रास्तपणे मानतो.
असो. आता मी माझ्यापुरती ही चर्चा इथे थांबवतो. मनोगतचे वाचक सूज्ञ आहेत, ते ही सर्व चर्चा वाचून स्वत:चे निष्कर्ष काढतीलच.
प्रदीप