गोळेकाका,
हा भाग ही फारच माहितीपूर्ण.
चक्रपाणी वर म्हणतात त्या प्रमाणे हरितगृह हाच शब्द प्रचलित आहे. पण आपण वापरलेला हरितकुटी हा शब्द सुद्धा साधा आणि चांगला वाटला. एका शब्दाला अनेक पर्याय उपलब्ध असावेत असे मला वाटते. त्यामुळे हा शब्द सुद्धा वापरात असावा असे वाटते.
सक्षमखर्ची, सृष्टीताप, पर्यावरणस्नेही हे व असे शब्द सुद्धा फार चांगले योजले आहेत. आपण या लेखमालेच्या रुपाने फारच भरीव काम केले आहे.
मी मध्यंतरी ऐकले की ओझोन च थर पातळ झाल्याने अतिनील किरणांचा प्रादुर्भाव वाढतो आणि परिणामतः सृष्टीतापमान वाढीचा दर वाढतो. तर त्या उलट हावेमध्ये जे सुक्षप्रदुषणकण (पार्टिक्युलेट मॅटर) मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे, त्याचा अंतराळात थर साठून तो अतिनील किरणांना आडवत आहे आणि त्यामुळे तो थोडा उपकारच ठरत आहे. (मी यासंबंधी ऐकले आहे. वाचले नाही. संदर्भ देता येत नाही त्यामुळे माहिती विश्वसनीय आहे असे म्हणता येत नाही.) पण एक नवा कल्पना प्रवाह म्हणून मला ती मोठी आकर्षक वाटली म्हणून येथे लिहिली.
आपला,
--लिखाळ.