अभय, तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते समजत नाही. पहिली बाजु न बघताच फक्त दुसरी बाजु बघण्यात काय अर्थ आहे?

पहिली बाजू तुम्ही मांडलीत, ती मीही पाहिली/अनुभवली आहे. मी दुसरीही बाजू पाहिली आहे आणी मी दोन्ही बाजू बघून माझे मत ठरवण्यास तयार आहे. तुम्ही?
मला वाटते तुम्ही समजायचा थोडा प्रयत्न केलात तर कळेलही. कदाचित माझी समजावण्याची शक्ती कमी पडत आहे. असो.

आणखी दुसरी बाजु बघण्यासाठी गुजरात मधुनच यायला पाहीजे, असा नियम थोडाच आहे?  शिवाय "दुसर्या बाजुच्या" सर्व मुद्याना मी उत्तरं दिलेली आहेतच.

नाही. तुम्ही 'दुसऱ्या बाजूला' काही वर्षे राहून पहा, म्हणजे कळेल. शब्दात सांगणे अशक्य आहे असे दिसते आहे. जे आपण पाहिले/अनुभवले नाही ते यःकश्चित आहे असा समज सोडून द्या. थोडे (अजून) जग फिरा. कदाचित कळेल. कदाचित नाही.

माझ्यामते आम्ही बेळगाव या विषयावर चर्चा करत आहे, त्यामुळे बेळगावचाच विचार करायला पाहिजे. नंदुरबार किंवा माटुंगा मद्ये बेळगावशी तुलना करण्यासारखी एक तरी गोष्ट आहे का?

येथे माटुंगा/नंदुरबार का उद्धृत केले याचेच कारण मी वर दिले आहे. आपण पुनः एकदा वाचा. वाचूनही न कळल्यासारखे करु नका.
जर वरील शब्दात सांगितलेलेही आपणास नाही कळले तर आपणास साष्टांग प्रणिपात व आपल्यासमोर शरणागती.

असो. मराठी विकिपीडियावर बेळगांव हा लेख या महिन्याचे मुखपृष्ठ सदर आहे. तेथे भेट द्या, जमल्यास तेथे (अजून) योगदान द्या. पुढील महिन्याचे सदर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, २००७ हा लेखही उत्तम जमतो आहे. त्यालाही भेट देउन तो सजवा.


येथे वाळक्या गप्पा मारुन कोणाचेही मतांतर झालेले नाही.

असो.

कळावे लोभ असावा, कटू पण परखड बोलल्यामुळे कमी झाला असला तर वाढवावा,

अभय नातू