तुम्हालातरी माझे म्हणणे पटले. धन्यवाद.
फक्त मला जे नाव ठेवलं ते आवडलं कारण
कुठल्याही बाबतीत वैचारिक आणि मानसिक दृष्ट्या लहान असणं योग्य कारण
लहानपणा दाखवून जे ज्ञान मिळवता येत ते मोठेपणा गाजवून किंवा लादून मिळवता
येत नाही हे पाहण्यास मिळाले पण खरंच मी वयाने लहान आहे. ते सगळं जाऊ दे
तर प्रेम कसे करावे.
हे प्रेमात पडल्यावर आपोआपच कळते.त्यात इतराचं मार्गदर्शन मिळूनही स्वतःच मन त्याला योग्य दिशा देत.
१.आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली होईल का कधीतरी असा आपण विचार करत असतो.
जिच्यावर प्रेम केलं ती कधीतरी आपली होईल का ? असा विचार आणि हट्ट का ?
२.ती नाही म्हणाली तर.
तिच नशीब खोट त्याला मी काय करणार.
३. असे म्हणतात की विवाहाच्या गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात हे चुकीचे आहे कारण दु:खी प्रेमविरांचे सांत्वन करण्यासाठी लिहिलेले हे वाक्य आहे.
मला वाटत हेच बरोबर आहे विवाहाच्या गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात.
आपला उगीच हट्ट असतो पाहिलं दुसरं प्रेम करण्याचा आणि मुळात तसेच करावे
ज्या गाठी बांधून ठेवल्या असतात त्या अगोदर शोधण्याचा हा प्रयत्न असतो.
४.मनातल्या मनात विचार करत असतो तिच्याशिवाय मी जगू शकत नाही मग ती कशी माझ्याविना जगते तेव्हा आपण विसरत असतो तिलाही आयुष्य आहे विचार आहे.
यात हि तिचंच नशीब खोट त्याला आपण काय करणार.
आपण आपलं प्रेम करत राहायचं कस ते आपलं मनच आपल्याला सांगत.
हे माझे विचार पण छान लिहिलं आहे तुम्ही