मी १०० % सुमीतशी सहमत आहे. ही कृती मात्र राजकारणी लोकांसारखी "गाजावाजा" न करता, स्वत:च्या उदाहरणावरून करावी.

मराठी दुकानदारांकडूनच खरेदी, मराठीचा बोलीभाषेतील वाढता वापर, नोकरी धंद्यामध्ये मराठी माणसांना जास्त प्राधान्य, मराठी लोकांशी यावर संधी मिळताच चर्चा करणे असे छोटे छोटे उपाय मी स्वत:च सुरू केले आहेत. आपल्या कुवतीनुसार काम करणे हेच मला वाटतं योग्य उत्तर असू शकेल.

"चिड चिड करू नका, पण चिडा (आणि कृती करा)"

प्रसाद.