जगातल्या कुठल्याच देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही हे त्रिकालाबाधित आणि निरपवाद सत्य आहे!
हा तुमचा निखालस चुकीचा समज़ आहे महोदय/महोदया! जर्मनी हे तर केवळ एक(च) उदाहरण झाले. महाराष्ट्रात आज़ही मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. माझे स्वत:चे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, आणि माझी मातृभाषाही मराठीच आहे. आणि ज्या शाळेतून माझे शिक्षण झाले, तेथे आज़ही मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध आहे. अशा अनेक शाळा आज़ मुंबईतही अस्तित्त्वात आहेत. इतकेच नव्हे तर महाविद्यालयांमधूनही मराठी माध्यमातून शिकण्याचा पर्याय आज़ उपलब्ध आहे. आणि त्याहूनही पुढी ज़ायचेच म्हटले, तर भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेतील अंतिम टप्प असलेल्या मुलाखतीही मातृभाषेतून देण्याचा पर्याय आज़ भारतात उपलब्ध आहे. चीन तसेच जपानमध्येही त्या त्या मातृभाषेतून शालेय शिक्षणच नव्हे तर उच्च शिक्षणही उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे वरीलप्रमाणे बिनबुडाची विधाने टाळलीत तरच उत्तम!