छापण्या नाकारती ते लेखना माझ्या
(विश्वजाली मोगलाई माजली आहे... )
हिंडण्या रस्ता अता उरला कुठे आहे?
पालिकेची पण खुदाई चालली आहे!
डोंगराच्या पायथ्याशी चालल्या पार्ट्या
ती जुनी कोठे 'पुण्या'ई राहिली आहे !
उत्तम! आवडले!! समयोचित भाष्य, जागरूकता, समाजाभिमुख ज़ाणीवा यांना विडंबनात मिळत असलेले स्थान निश्चितच सुखावह, ज्यायोगे बारबाला, बाटली किंवा तत्सम आवर्ती कल्पना नज़रेआड करण्याज़ोग्या!
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.