प्रत्येक स्थळाचा आणि प्रसंगाचा एक ड्रेसकोड (याला मराठी शब्द सुचवा) असतो. प्रत्येक समाजाची एक मानसिकता असते. साडी हे बऱ्याच स्त्रियांसाठी अडचणीचे आणि गैरसोयीचे वस्त्र असण्याची शक्यता आहे. अनुभवावरून सांगता येईल की स्टेशनला लागणाऱ्या चालत्या लोकलमध्ये जागा मिळावी म्हणून बायका फूट दोन फूट (अतिशयोक्ती नाही) साडी वर खोचून आत उड्या मारतात तेव्हा त्या सलवार-कुर्ता किंवा जीन्स का वापरत नाहीत हा प्रश्न पडतो. अशावेळी साडी त्यांना आणि काही इतरांना गैरसोयीची आणि काही बघ्यांना अतिसोयीची असल्याचा अनुभव येतो.

याउलट आपली मानसिकता अशी असते की एखादी मोठ्ठी सर्जन मिनी स्कर्टमध्ये तुम्हाला येऊन तुम्हाला असा गंभीर आजार आहे तेव्हा अमुकतमुक उपाय करा असे सांगेल आणि दुसरी सर्जन व्यवस्थित साडी नेसून तेच उपाय सांगेल तर माणसे दुसरीला अधिक महत्त्व देतात. (हा कौटुंबिक अनुभव आहे.) याच ठिकाणी एखादी राजकारणातील स्त्री जीन्समध्ये किंवा मंदिरा बेदी सारख्या लोकट टॉपमध्ये भाषण करताना दिसली तर तिच्याकडे लोक निश्चितच गांभिर्याने पाहणार नाहीत. याउलट, मुंबईतील काही डिस्कोथेकमध्ये साड्या घालून आलेल्या स्त्रियांना आत येण्यास बंदी केल्याचे वाचले होते. ही झाली आपली मानसिकता.

त्यांच्या मते श्री.थरूर यांचा हा पुरुषी दृग्टीकोण आहे .त्यानी पुरुषानी धोतर किंवा लुंगी आणि कुर्ता यांचा वापर सोडल्याचे दु: ख व्यक्त करून त्यांना ते वापरण्याचा उपदेश का केला नाही

काय असतं ना की माणूस दुसऱ्यांच्या चुका/ वैगुण्ये पटकन काढतो. स्वत: कोठे कमी पडतो किंवा चुकतो हे त्याच्या ध्यानीही नसते. थरुर यांनी आपल्याला साडीतील स्त्रिया अधिक आवडतात एवढेच विधान केले असते तर त्यांच्यावर ही पाळी आलीच नसती.

असो. इमेल लिहून निषेध करणारे हल्लेखोर असतात काय? नाही, एखाद्या चर्चेत एखाद्याने निषेधाचा सूर काढल्यास तो ही हल्लेखोर ठरेल काय? या महिलांना हल्लेखोर आपण ठरवले की मूळ बातमीदाराने. मूळ बातमीचा दुवा आवडला असता.