बाह्याकर्षण हे रूप,वेशभूषा व प्रतिमेबाबत असू शकते तर प्रेम (आवड निवड,समान/पूरक स्वभाव) असते. (संदर्भ: गुड्डी नावाचा चित्रपट.) बहुतेक वेळा महाविद्यालयात (विशेषतः गद्धे पंचविशीत) आकर्षणच जास्त असते.(एकाच नटाचा फोटो बहुतेक मैत्रिणीकडे असतो)

प्रेमात आकर्षण असेल पण फक्त आकर्षण प्रेम होवू शकत नाही.

अजून सुकुमार कवी प्रेमाची ठीक व्याख्या करू शकत नाही मी पामर काय करणार ?

प्रेम = ३० परस्परांवर गाढ विश्वास+३० निरपेक्ष आपुलकी+२० ज्या/जिचेवर प्रेम आहे ती/त्याला सुखी / आनंदी ठेवण्याची तळमळ+१० या तिन्ही बाबी साध्य करण्याकरिता लागणारी अती तीव्र धेय्यासक्ती

यात व्यक्तीपरत्वे/वयोमानानुसार थोडे बाह्यकर्शण,स्वभाव विशेष,प्रावीण्य मोहिनी(कलाकारांचे बाबत) असा कमी अधिक फेर फार होऊ शकतो.

आपले काय मत? प्रतिसादाबद्दल धन्यवाद