मुंबईत किती मराठी आणि किती परप्रांतिय याचा विचार करण्यापेक्षा ते का याठीकाणी टिकुन आहेत याचा विचार करावा. त्यांची पडेल ते काम करण्याची तयारी, आपले घर सोडुन आल्यामुळे शिक्षणात अथवा कुठल्याहि क्षेत्रात मेहेनत घेण्याचि तयारी. आणि हो मराठी माणसाची अपेक्षे बाहेर मदत करायची सवय.

 पण मला वाटते कि मराठी माणुस हा काहि मुर्ख नव्हे. आज मुंबईत जरी मराठी माणुस कमी असला तरीहि परदेशात, विषेशत: अमेरिका, न्युझीलंड, ईग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमधुन मराठी माणुस जास्त प्रमाणात स्थायिक झालेला आहे. जेव्हा ह्या देशातील जनता बेकारी साठी आंदोलने करत असते त्यावेळी त्यांचा रोख हा भारतीय (यात सगळे आले, मराठी सुद्धा) लोकांनाहि विरोध होतोच. मग जर आपल्याल परप्रांतात नोकरी करण्याची घर बांधण्याची जशी ईच्छा असते, तशिच ती आपल्या देशातिल बहुसंख्य जनतेला मुंबईत येऊन घर बांधण्याचि असते.