सोनाली,
अभंग आवडला..सगळ्याच पंक्ती. अभंगातलं पावित्र्य खूप सुंदर - सहज व्यक्त झालं आहे.

'थरथरे ज्योत'वरून 'अशी पाखरे येती' मधल्या पाडगावकरांच्या -
'हात एक तो हळु थरथरला पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती'
या अप्रतिम ओळी आठवल्या...

झाडाची सावली पाखरा विसावा
मनाला विसावा  ध्यास तुझा 

इथे विसावा या शब्दाची पुनरुक्ती टाळण्यासाठी 'तद्बत जडावा' (किंवा 'तद्वत'पेक्षा हलका-फुलका शब्द) असं केलं तर?

- कुमार