तुटून नाही पण ज्या अधिकारवाणीने आपण बोलता त्याचे समर्थन आपल्याला करता येते का हे जाणून घेण्याची इच्छा नक्कीच आहे.
वर बायकांनी विचारले आहे की आम्ही साड्यांत वावरावे तर पुरुषांनी धोतर, कुडत्यात का नाही? तुम्हाला नाही वाटत का कि समानतेचे युग आहे, निदान कपड्यांच्या बाबतीत तरी? पाश्चात्य धाटणीचे कपडे म्हणजे तोकडे कपडे असा आपला समज का बुवा? पाश्चात्य कपडेही संपूर्ण अंग झाकणारे असतात, सुटसुटीत असतात.
साडी नेसणाऱ्या, डोकंभर पदर घेणाऱ्या, गावात राहणाऱ्या अशिक्षित स्त्रियांना पळवल्याचे, बलात्काराचे किस्से वाचले आहेत का आपण? त्यांचे आणि तोकडे कपडे घातले म्हणून किंमत मोजावी लागली अशा स्त्रिया यांचे तुलनात्मक प्रमाण माहित आहे का? ते आपल्याला कोठे व्यस्त आहे असे समजल्यास जरूर लिहा. स्वतःतील हिडिसवृत्ती झाकण्यासाठी पुरुष आपल्या वासनेचे खापर स्त्रीच्या कपड्यांवर फोडतो हे दाखवण्यासारखे उत्तम उदाहरण दुसरे नाही.
याचा अर्थ स्त्रियांनी हवे तसे कपडे घालून फिरावे असा नाही. समयोचित, स्थळोचित कपडे घालावे परंतु स्त्रियांच्या वेशभूषेवर जितके पुरुष हवालदिल होतात तितक्या स्त्रियांना पुरुषांच्या वेशभूषेवर हवालदिल होताना पाहिले का कधी?
श्री.थरुर म्हणतात वैगुण्य झाकण्यास साडीची मदत होते. ढेरपोट्या, टक्कल पडलेल्या, कमरेत सुटलेल्या पुरुषांचे वैगुण्य झाकण्यास कोणते कपडे वापरावे सांगाल का?