गझल बरी आहे पण सुधारणेस वाव आहे बुवा.

दूर कोनाड्यात चरखा पायपोसालाच खादी
जीर्ण झाली लोकशाही चालते ती फक्त गादी

ठीक पण चार खालचे दोन तुकडे वरच्या दोन तुकड्यांशी आणखी जुळायला हवेत. आणि दोन ओळींचा शेर होतो, चार तुकड्यांचा नाही:)

क्रूर काही, शूर काही, भेटले मग्रूर काही
भेटले काही जिहादी, भेटले हिंदुत्त्ववादी

हिंदुत्त्ववादी चूक. क्रूर शूर नंतर पुन्हा मग्रूर म्हणजे नुसता शब्दांचा खेळ. शेर अपूर्ण.

ह्या कश्या बुद्धीबळाच्या जीवघेण्या भ्रष्ट चाली?
भांडती रंगांवरूनी एकमेकांशीच प्यादी

बुद्धीबळाच्या चूक. भ्रष्ट शब्द चपखल बसत नाही. नाहीतर कल्पना बरी आहे.

कोण गेले? कोण मेले? गावही उद्ध्वस्त झाले
नेमकी राहून गेली तेवढी मतदारयादी

कोण गेले नंतर कोण मेले ही भर वाटते. ही तसा भरीचाच. मतदारयादी राहून गेली म्हणजे? शेर स्पष्ट होत नाही.

प्रेम नाही, मद्य नाही, काम नाही, दाम नाही
जोडले मी शब्द काही, लागलो त्यांच्याच नादी

गाल नाही, गाल नाही, गाल नाही, गाल नाही. याद्या देणे सोपे असते. शेर फारसा परिणामकारक नाही तरी खालची ओळ बरी आहे.