१.वर बायकांनी विचारले आहे की आम्ही साड्यांत वावरावे तर पुरुषांनी धोतर, कुडत्यात का नाही?

या मताशी सहमत.

२.पाश्चात्य कपडेही संपूर्ण अंग झाकणारे असतात, सुटसुटीत असतात.

ते कितीही कमी असले तरी पाश्चात्य लोक असे कपडे घालणाऱ्यावर दुर्लक्ष करतात. पण

भारतातल्या लोकांचा असे कपडे घातल्यावर जास्तच लक्ष देतात. मुंबईत हे मी बस मध्ये

स्वतः अनुभवलं  आहे याला जवाबदार कोण ती मुलगी का तो बघणारा माणूस असा गोंधळ

माझ्या मनात निर्माण झाला. घातलेल्या कपड्यात स्वतःला जपता आलं नाही तर असे कपडे

घालण्यात काय उपयोग. आणि स्वतःला जपायचं असेल तर असे कपडे घालून काय

उपयोग.

३.साडी नेसणाऱ्या, डोकंभर पदर घेणाऱ्या, गावात राहणाऱ्या अशिक्षित स्त्रियांना पळवल्याचे, बलात्काराचे किस्से वाचले आहेत का आपण? त्यांचे आणि तोकडे कपडे घातले म्हणून किंमत मोजावी लागली अशा स्त्रिया यांचे तुलनात्मक प्रमाण माहित आहे का?

या मुलींचा आणि बायकांचा उपयोग शहरातल्या घाणेरड्या माणसांचे चोचले पुरवण्यासाठीच

केला जातो. हे सगळं शहरातल्या माणसांसाठीच करतात ज्यांचं हे सगळं बघून मन वेड

होत त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात.( याच समर्थन नाही करत मी )

 आणि या चंगळवादी संस्कृतीत टिकून राहण्यासाठी काही चांगल्या घरातल्या मुलींनी सुधा

हा मार्ग निवडला. याला जवाबदार कोण.

 हे टाळण्यासाठी कायदा आहे पण मुलींनी किती मर्यादेत राहियच हे जर एका

महाविद्यालयाने ठरवलं तर त्यावर तीव्र निषेध होतो.

( यावर स्त्रियांना स्वतःच स्वातंत्र्य हिरावून घेतल्या सारखं वाटत का ? )

मी स्वतः: मध्ये का बदल करावा का तर सगळेच करतात म्हणून. पब आणि डिस्को

मध्ये जायचं का तर सगळे जातात म्हणून. या सगळ्या गोष्टींचा संस्कृती बदलली

म्हणून स्वीकार करावा का ? त्याचे दुष्परिणाम माझ्यासमोर आहेत आणि वाचण्यास

सुधा मिळतात मग कशासाठी हे सगळं लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दुष्टीकोन

बदलावा म्हणून ? मी सुधा फॉरवर्ड आहे हे दाखवण्यासाठी. तर मला नाही जमणार.

मग तोकडे कपडे घालून मुलींनी अशा संस्कृतीत टिकून राहण्याचा अट्टहास का ?

निदान या चर्चचा तरी मुद्द्याशी काहीच संबंध नाही. माझे समज/गैरसमज दूर होण्यासाठी.

पण बायकांनी,मुलींनी साडीच घालावी अस वाटत नाही पण स्वतःच्या सोयीसाठी

घातलेल्या कपड्यांचा अतिरेक हि होवू नये किंवा दुसऱ्यांसाठी तमाशा बनू नये अस वाटत.