गझल बरी आहे पण सुधारणेस वाव आहे बुवा.

मान्य आहे.

ठीक पण चार खालचे दोन तुकडे वरच्या दोन तुकड्यांशी आणखी जुळायला हवेत

'आणखी' म्हणजे कसे?

हिंदुत्त्ववादी चूक.

का?

क्रूर शूर नंतर पुन्हा मग्रूर म्हणजे नुसता शब्दांचा खेळ.

मी कुठे नाही म्हटले. खेळ का मांडू नये?

शेर अपूर्ण.

माणसाची प्रवृत्ती की धर्मवेडे गट, कशावरून वर्गीकरण करायचे हे तुमचे तुम्हीच ठरवा.

बुद्धीबळाच्या चूक.

का?

भ्रष्ट शब्द चपखल बसत नाही.

ह्म्म्म्म. सुधारणेस वाव आहे.

कोण गेले नंतर कोण मेले ही भर वाटते.

का? उदा. दंगलीत किंवा फाळणीत कोण मेले? कोण घरदार सोडून गेले याचा अहवाल मिळतो काय?

ही तसा भरीचाच.

 पटले.

मतदारयादी राहून गेली म्हणजे? शेर स्पष्ट होत नाही.

लोक मेले, हरवले तरी त्यांचे नाव मतदारयादीतून जात नाही. मृत्यूपश्चातही लोकांनी मतदान केल्याची उदाहरणे आहेत. भारतात तरी असे होते बुवा.

गाल नाही, गाल नाही, गाल नाही, गाल नाही. याद्या देणे सोपे असते.

हो हो, सोपे असते :). मी दहा गोष्टींच्या नादी लागेन हो पण तूर्तास चारच दिल्या आहेत.  दहा वरून संस्कृतातले एक सुभाषित आठवले-
( शब्दक्रम आठवत नाही. चू. भू. द्या. घ्या. )

मा मनो मधुपो मेघो मर्कटो मत्कुणो मरुत्।
मदो मद्यपो मत्स्यो मकारा दश चञ्चलाः॥

यादी आणि शब्दांचा खेळ आहे बुवा नुसता हा ;)

सुधारणा सुचवल्याबद्दल आणि बरे म्हटल्याबद्दल आभार. 'असे असू नये' सांगतानाच 'कसे असू शकेल/ कसे असावे' हेही सांगितलेत तर 'बरे' होईल.