कोणि कसे कपडे घालावे याचा निर्णय ज्याने त्याने घेतला तरच बरे होईल, कारण आपापल्या कार्यपद्धतिनुसार आणि सोयीनुसार कपडे घातल्यामुळे आपल्याला मानसिक आणि शारिरीकरित्या आराम वाटतो आणि बव्हंशी आपण काय काम करतो किंवा कुठल्या कार्यक्षेत्राशी निगडित आहोत याचा समोरच्या व्यक्तिस अंदाजही येतो.

हा पण यापश्चात आपण कोणाच्या आवडीनिवडी बदलु शकत नाहि. आणि कुठल्याहि पेहेरावाला चांगला किंवा वाईट असे अधोरेखित करण्याचा कोणालाहि हक्क नाही. आज कोणत्याही स्त्रि अथवा पुरुषाच्या पेहेरावातून जाणता अजाणता काहि अंगप्रदर्शन होत असेल तर त्यापुढिल येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यास ज्यानेत्याने तयार रहावे.