इतका तपशील लक्षात ठेवल्याबद्दल धन्यवाद, मीराताई. 'यलो फेस' ही (का कुणास ठाऊक) माझे अत्यंत आवडती होम्सकथा. तिचा अनुवाद करण्याचा मोह असंख्य वेळा होऊनही स्वतःच्या मर्यादांची जाणीव असल्याने तो मी टाळला आहे. आता समर्थ शब्दांत तो वाचताना होणारा इच्छापूर्तीचा आनंद अपार आहे.
कथेचा पहिला परिच्छेदही अनुवादात घेतला असता तर चालले असते. aimless bodily exertion, indefatigable यांचे तुम्ही कसे अनुवाद केले असते हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.
आता लवकर या जोडगोळीला नॉर्बरीला धाडा. 'आय एम नॉट अ व्हेरी गुड मॅन एफी, बट आय थिंक दॅट आय एम अ बेटर वन दॅन यू हॅव गिव्हन मी क्रेडिट फॉर बीइंग' हे तुमच्या शब्दांत वाचण्याची उत्सुकता आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.
सन्जोप राव