मी मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणासंबंधी केलेले विधान पूर्ण विचारान्ती केले होते.
चक्रपाणींनी महाराष्ट्रात राहून मराठीत शिक्षण घेतले याच काहीच आश्चर्य नाही. महाराष्ट्रात न राहता हे शक्य केले तर प्रत्येक देशात मातृभाषेत शिक्षण घेता येते असे सिद्ध झाले असते.
जर्मनीमध्ये ज्यांची मातृभाषा जर्मन नाही असे बरेच लोक राहतात. अशा लोकांच्या मातृभाषांची एक छोटीशी यादी खाली देत आहे. ह्या फक्त मुख्य भाषा आहेत. त्याच्यापैकी अनेक भाषांच्या ३ त ३० उपभाषा म्हणजे बोलीभाषा आहेत.
अडायगे, ऍरमाइक, अरेबिक, अलेमॅनिक, अल्बेनियन(५), इंग्रजी, इटालियन, उर्दू, ओसेटिन, कझाक,(१०), कॅटॅलन, कल्मायक, काबुवर्डियानू, कुर्डिश, कोरियन(१५), कोल्श, किर्मंजकी, क्रोशियन, ग्रीक, चिनी(२०), चेचेन, जपानी, ज्यूटिश, टॅरिफिट, टायग्रिना(२५), टोस्क, ट्यूरोयो, डच, डॅनिश, डिमली(३०), तमीळ, तुर्कमेनियन, तुर्की, पुश्तू, पोर्तुगीज(३५), पोलिश, प्लोडिश, फारसी, फील्झिश, फ़्रिझियन(४०), बव्हेरियन, बंगाली, मराठी, मल्याळी, मेनफ्रँकिश(४५), यिडिश, येनिश, रशियन, रोमानी, लक्झेंबोर्गस,(५०), लॅटव्हियन, लिंबरगिश, वीगर, व्हिएटनामीज, सॅक्सन(५५), सिलेशियन, सेटरफ्राइसिश, सॉर्बियन, स्पॅनिश, स्वाबियन(६०), हाउसा, हिंदी, हिब्रू(६३) वगैरे वगैरे. (या नावांच्या उच्चारांची आणि अर्थांची मी शब्दकोशात पाहून खात्री करून घेतली आहे, तरी चू.भू.द्या̱ घ्या.)
ह्या भाषा बोलणारे सर्व विद्यार्थी जर्मनीत त्यांच्यात्यांच्या मातृभाषेतून शिकत असतील यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही.
आता छूंचा मुद्दा: जर्मनीत इंग्रजी किंवा फ़्रेंच माध्यमातून केजीपासून बारावीपर्यंत शिकण्याच्या शाळा आहेत. मी त्यांची यादी देऊ शकतो. स्पॅनिश माधमाच्या शाळासुद्धा असाव्यात, पण मला शोधण्यात जास्त वेळ घालवता आला नाही. म्हणजे जर्मनीत मातृभाषा-जर्मनमधूनच शिक्षण घेतले पाहिजे असे नाही.
निष्कर्ष: जगातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्याच मातृभाषेतून शिक्षण देणारा एकही देश नाही. (२) जर्मनीत इंग्रजी-फ़्रेंच मधून शालेय शिक्षण घेता येते.
महाराष्ट्राची तुलना जर्मनी-जपानसारख्या छोट्या देशांशी करणे योग्य नाही. रशियावगळून उरलेला सर्व यूरोपखंड भारतात सहज मावू शकतो इतका भारत मोठा आहे. तुलना करायचीच असेल तर अमेरिकेतल्या एखाद्या संस्थानाशी करावी.
रामशास्त्री प्रभुणे संस्कृत शिकण्यासाठी काशीला गेले होते. आजही परिस्थिती तीच आहे. संस्कृतच्या उच्च शिक्षणासाठी काशी विश्वविद्यालय, बिहार संस्कृत विद्यापीठ, जर्मनी किंवा हॉर्वर्डला जावे लागते, किंवा तेथील विद्वानांनी लिहिलेली पुस्तके मिळवून इथे अभ्यास करावा लागतो. एकोणीसाव्या शतकात मराठी लेखकांनी लिहिलेली जी काय थोडीफार पुस्तके होती, ती आता अप्राप्य आहेत. इत्यलम्!