जगातल्या कुठल्याच देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही हे त्रिकालाबाधित आणि निरपवाद सत्य आहे! 

हे तुमच्या आधीच्या प्रतिसादातील विधान आहे, ज़े मी माझे स्वत:चे उदाहरण देऊन चुकीचे असल्याचे दाखवून दिले आहे. मला माझ्या (भारत) देशात राहून माझ्या मातृभाषेत शिक्षण घेता येते. तामिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकात ज्या लोकांची मातृभाषा तामिळ किंवा कन्नड आहे, त्यांनाही त्या त्या मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा उपलब्ध आहेतच. जर्मनीमध्ये ज्यांची मातृभाषा जर्मन नाही, अशांना त्यांच्या त्यांच्या मातृभाषांमधून शिक्षण मिळेलच नाही, हे कबूल; पण ज्यांची मातृभाषा जर्मन आहे, त्यांना मिळतेच की नाही मातृभाषेतून शिक्षण? किंवा ज्यांची मातृभाषा फ़्रेंच आहे, त्यांना मिळते की नाही फ़्रेंच माध्यमातून शिक्षण? मग तुम्ही वरीलप्रमाणे जनरलाइज़्ड विधान कसे काय करू शकता? पटत नाही.

राहता राहिला तुमच्या खालील विधानाबाबतचा प्रश्न:

मी मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणासंबंधी केलेले विधान पूर्ण विचारान्ती केले होते. चक्रपाणींनी महाराष्ट्रात राहून मराठीत शिक्षण घेतले याच काहीच आश्चर्य नाही. महाराष्ट्रात न राहता हे शक्य केले तर प्रत्येक देशात मातृभाषेत शिक्षण घेता येते असे सिद्ध झाले असते.

महाराष्ट्राबाहेर राहून मराठीतून शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा मी वरीलपैकी माझ्या एकाही प्रतिसादात केलेली नाही, पण कोणाची तशी इच्छा असेल, तर त्यात काही गैर नाही, असे म्हटले आहे. तशी अपेक्षा करणे शक्य नाही, हे मी बऱ्याच ठिकाणी अध्याहृत समज़ले आहे. उलटपक्षी महाराष्ट्रात राहणाऱ्या भिन्नभाषिक जनांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा मात्र अस्तित्त्वात आहेत, हे सुद्धा मी माझा आधीच्या प्रतिसादात म्हटलेच आहे (आणि ती वस्तुस्थिती आहे). तामीळनाडूमध्ये न राहताही महाराष्ट्रात राहून तामिळ मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यास तामिळ भाषेतून शालेय शिक्षण घेणे सहज़ शक्य आहे.

राहता राहिला प्रश्न महाराष्ट्राची तुलना इतर देशांशी करण्याचा. तर त्याबाबतीत असे म्हणता येईल, की तुम्ही केलेल्या जनरलाइज़्ड विधानाला महाराष्ट्रातच अनेक अपवाद सापडत असतील, तर इतर देशांकडे महाराष्ट्रानंतरच वळता येईल. आणि तसे वळलेच तर जर्मनीत राहणाऱ्या नि फ़्रेंच मातृभाषा असलेल्या फ़्रेंच मुलाला त्याच भाषेत शिक्षण उपलब्ध आहे, हे तुम्हीच वरील प्रतिसादातून दाखवून दिले आहे.

त्यामुळे तुमच्या विधानांवर शेंबडे पोर विश्वास ठेवू शकेल; मी मात्र नक्कीच नाही. असो.