प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे चित्त. मतल्यामधील सानी मिसरा म्हणताना लयदोष निर्माण होतोय हे खरेच आहे. इथे आसवे 'च + भ'रती असा एक 'गा' असल्याने हा दोष आहे. 'आसवांनी भरे रिक्त प्याला' असे केले तर ठिक होईल.पण अजुनही चांगली शब्दरचना शोधतोय.
'पापणीला तडे वास्तवाचे' हा मिसरा बदलण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. शिवाय 'मरण दररोज सांगून जाते' हे देखील कमकुवत आहे.त्या बद्दलही विचार चालू आहे.गझलेच्या प्रांतात मी फारच नवोदीत/विकसनशील आहे. लिहित जाईन तसे शिकत जाईन :)