>>म्हणजे वखवखलेल्या नजरा फक्त पुरुषांच्याच असतात असे समजावे का ?<<
असा दावा नाही परंतु सर्वसाधारणतः मुलींना अनुभव याचेच येतात ना? वरती कुणीतरी जोरात प्रतिपादन केले होते की बायका कमी कपडे घालतात म्हणून पुरूष वाईट नजरेने बघतात. त्या अनुषंगाने हे वाक्य घेतलेत तर बरे होईल. मागचा पुढचा संदर्भ न लक्षात घेता नुसतं वाक्य घेतलं तर गोंधळ होणारच.

>>म्हणजे अशा स्त्रिया असतात हे मान्य आहे ना ? मग हा विरोधाभास नाही का ?<<
हे अमान्य कधी केले होते? एक्झिबिशनिस्ट प्रवृत्ती ही लिंगसापेक्ष नसते. पुरूष आणि स्त्रीया दोन्ही असतात.  मी वेशसंकल्पना करताना 'त्या' व्यवसायासाठी अशीच वेशभूषा निवडीन. तेव्हा वरील वर्णन हे डिग्निफाईड व्यक्तीला लागू होणार नाही हे खरे आहे पण तरी विरोधाभास नक्की कशात आहे?

>>निती अनिती ही व्यक्तिसापेक्ष असते व हल्ली लिंगसापेक्ष उरलेली नाही !<<
हल्ली काय ती कधीच लिंगसापेक्ष नव्हती. तसा दावा मी कधी केला नाही तेव्हा....