जी. एस. छान लिहिलेस, लिहित रहा..
खुपच सुंदर झाला हा ट्रेक. 'घनदाट' जंगल हे या ट्रेक चे वैशिष्ठ्य. प्रत्येक बाण्याच्या खुणेपाशी नजर पुढच्या खुणेचा शोध घेण्यासाठी भिरभिरत होती आणि त्याचवेळी मन त्या अनामिक गिरीप्रेमींना धन्यवाद देत होते. आणि GS ने वर्णिलेल्या 'त्या' माचीवरुन दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतीम, खाली दिसणारे गच्च जंगल, त्यामधुन धावणारी नागमोडी घाटातली वाट, या सगळ्यांचे शब्दात वर्णन करणे अशक्य. इतर ट्रेक मधे कुठेतरी रस्त्याने मानवी अस्तित्वाच्या काही तरी खुणा जाणवत राहतात पण या जंगलात शिरल्यानंतर अशा काहीही खुणा दिसत नव्हत्या. काही क्षण स्तब्ध बसल्यानंतर पक्ष्यांच्या विविध आवाज मन प्रसन्न करुन टाकते. स्वतः चे अस्तित्व विसरायला लावण्याचे कसब या परिसरात नक्कीच आहे.
वसंतगडावरचे पक्षीदर्शन, चाफळच्या राममंदीरातील प्रसन्न वातावरण, तिकडे मनसोक्त अनुभवलेल्या पक्ष्यांच्या लीला, आणि रात्रीच्या जेवणातला 'शेंगदाण्याचा महाद्या' , किती किती लिहावे काय काय आठवावे. हे सगळे सगळे दिर्घकाळ स्मरणात राहणार यात शंका नाही..
जयगडाच्या संदर्भातील एक लिन्क
http://www.wikimapia.org/#y=17454951&x=73698939&z=17&l=0&m=a&v=2
उजविकडे दुरवर पसरलेले जंगल सगळे काही सांगुन जाईल
.. सुभाष(कुल)