पण तेथे देण्यासाठी घाबरलो-
हुंदका साधा तुझा सांगून गेला,
वचनांत तुला माझ्या बांधून गेला.
स्पंदने उरातली ती मोजून गेला,
नकळत साद मजला घालून गेला.
वाहलो त्या हुंदक्याच्या मोहात मी,
हातून गुन्हा असाही होऊन गेला.
अबोला मजवर का धरला सखे,
सांगताना तुझा बांध फोडून गेला.
तोडली बंधने तो जोडून गेला,
प्राक्तनी तुझ्या मला सोडून गेला.