मुद्दा हा आहे की जर्मनीमध्ये राहूनही जर्मन मातृभाषा असलेल्या मुलास जर्मन भाषेतून शिक्षण मिळणाऱ्या शाळेत आणि फ़्रेंच मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यास फ़्रेंच भाषेतून शिक्षण मिळणाऱ्या शाळेत शिक्षण घेणे शक्य आहे. याचा सरळा अर्थ असा होतो की आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आग्रह धरण्यात काही गैर नाही; किंबहुना काही परिस्थितीत (ज़से तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून स्पष्ट होते) ते पूर्ण शक्यही आहे