शुद्ध मराठीनी चर्चेचा शेवट केल्याचे जाहीर केले तरी मूळ मुद्दा मनोगतींनी नजरेआडच केला असे म्हणावे लागेल. श्री . थरूर यांचा मुद्दा होता साडीसारखे सौंदर्य वाढवणारे वस्त्र केवळ सोयीचा विचार करून महिलावर्गाने वापरणे कमी केले तर हळूहळू ते लुप्त होऊन पुढील काळात वस्तुसंग्रहालयातच पहायला मिळेल की काय.माझे मत मात्र तसे नाही लग्नसराईत आणि इतरही वेळी साड्यांच्या दुकानात होणारी गर्दी,साड्यांच्या दुकानांची वाढती संख्या,आकाशवाणीवर ऐकू येणाऱ्या पेशवाई वगैरेंच्या जाहिराती पाहून आणि ऐकून निदान भारतीय स्त्री तरी कितीही मुक्त झाली तरी साडी खरेदी करणे ही तिची हौस (दागिन्यांच्या हौशीप्रमाणेच) ती सोडणार नाही याची मला खात्री आहे.परवा तर एक जीन्स आणि टीशर्ट घातलेली आई आपल्या साडी नेसलेल्या अष्टवर्षीय कन्येस शाळेत सोडायला (शाळेत विविध वेषभूषा स्पर्धा असावी) चाललेली पाहिली आणि साडीचे (वर्तमान नसले तरी) भवितव्य अगदीच अंध:कारमय नाही याची खात्री झाली.