कथा मूळ रुपात वाचली होती पण मराठीत वाचताना मजा आली. भाषाही एकदम नैसर्गिक.
"मी नर्सला हेही सांगितलं की लूसीचा चेहरा, हातपाय नेहमी झाकून ठेवायचे. एक निग्रो मुलगी आपल्या वस्तीत रहातेय अशी चर्चा इथे व्हायला नको. "
"हे आमचं दुर्दैव की आमच्या मुलीच्या वाट्याला तिच्या मातेचं रंगरूप न येता तिच्या पित्याचं रंगरूप आलं! ही माझी लूसी तिच्या पित्यापेक्षाही जास्त काळी आहे."
ही वाक्ये वाचून वाईट वाटलं. त्याकाळी इतका वर्णभेद होता की छोटी मुलगी पण त्यातून न सुटावी??