रोहिंग्या बांग्लादेशात refugee. बांग्लादेशी भारतात refugee. आणि भारतीय पश्चिमी देशांत. Refugee नसले तरी तसलंच काहीतरी. विचारांची वावटळ मनात सुरू होते.

कालच बीबीसीवर जगभरातून इंग्लंडात निर्वासित कसे घुसतात ते दाखवले होते. फ्रान्सच्या किनाऱ्यावर प्लास्टिकच्या झोपड्यातून राहणारे इराकी, अफगाणी, आफ्रिकन लोक. त्यांची दारूण परिस्थिती दाखवून त्यांचं काय करायचं असा प्रश्न कार्यक्रमाच्या सूत्रधाराने विचारला. त्यांना जास्त सोयी दिल्या तर आणखी लोक येतील म्हणून तेही करता येत नाही वगैरे म्हणाला. अश्या बातमीनंतर एकदम फुटबॉल आणि क्रिकेटच्या बातम्या सुरू झाल्या. एकदम निरर्थक वाटणाऱ्या.

कोणावरतरी मुजोरी करावी, डॉमिनेटिंग असावे असे माणसाला आतूनच वाटते की काय अशी मला आता शंका येऊ लागली आहे.