विषय चांगला आहे. पण लिहायच का? आणि लिहुन होणार काय?
बी आर टि चांगली कि वाईट हा एक मुद्दा आहे. तो पुण्यासाठी योग्य आहे कि नाही हा एक. जर असेल तर हि व्यवस्था कशी असली पाहिजे हा एक मुद्दा...
बी आर टि चे अनुभव:
- मी प्रवास केला नाही. पण प्रवास करणारे खुष आहेत.
- ६ सीटरचा (टमटम वा डुक्कर रिक्षा) धंदा खालावला आहे. त्यामुळे प्रदूषण अन कोंडी बऱ्या पैकी कमी झाली आहे. नाहीतर एरवी अमानुष प्रकारे माणसे कोंबुन मनात येईल त्या प्रमाणे थांबणे हे त्यांचे प्रकार कमी झाले आहेत.
- सातारा रस्त्यावर १-२ अपवाद वगळता सुरळीत वाहतुक आहे.
पुण्याची वाहतूक समस्या:
- याला सर्वात जास्त पुणेकर स्वतः अवलंबून आहेत. जेव्हा शहरावर आपण स्वतः प्रेम करून सांभाळावे हि गरज होती त्यावेळी "आम्हा काय त्याचे" म्हणून दुर्लक्ष केले. आज आता ते प्रत्येकाच्या गळ्या पर्यंत आल्यावर आवाज वाढतो आहे.
- जेव्हां लोक प्रतिनिधी निवडायचे होते त्यावेळी मिळालेल्या सुट्ट्या मजा करण्यात घालवल्या.
- वाहतुकिची शिस्त म्हणजे काय या बद्दल दुसऱ्याला शिकवणे अन स्वतः मात्र वाट्टेल तसे वाहन चालवणे.
- सर्वात जास्त दुचाकी, ज्याने प्रत्येकाला रस्ता स्वतःच्या .... चा वाटतो.
- सामाजिक जबाबदारीची उणीव.
लिहिण्या सारखे बरेच आहे.