प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. बरंच काही लिहायचं होतं पण सुमीत म्हणतात त्याप्रमाणे कथा आटोपती घेतली आहे.
खरंतर लेखाचे शीर्षकच मी चुकीचे दिले असे वाटतेय. कारण यात मला फक्त रेफरलबद्दलच नाही तर इथल्या 'चेन/टेले मार्केटिंगबद्दलही' बोलायचं होतं. रेफरलचं म्हणाल तर ठिक आहे की दोघांचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे. पण आपला फायदा व्हावा म्हणून चुकीच्या गोष्टीच रेफर केल्या तर? आणि या चेन मार्केटिंगच्या लोकांना कितीही वेळा स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले तरी ते मागेच लागतात. आणि त्यासाठी आपल्या भारतीयत्वाचा आधार ते घेतात याचा राग येतो. असो.
-अनामिका.