वा जयंतराव,

काळ तो, त्याला कुणाची काय पर्वा
तो हवे त्याला तसे वागून गेला - वा!

नेत होते ते तुला ओढून जेंव्हा
कोणता तो शाप मज थिजवून गेला?
- हा शेर अप्रतिम... मला उमजल्याप्रमाणे तो द्रौपदीला उद्देशून आहे. 'शाप' हा भीष्माचार्यांना उद्देशून आहे की कर्णाला की वेगळ्याच कुणाला? (भीष्माचार्यांची प्रतिज्ञा हा शाप ठरला आणि दुर्योधनाची मैत्री हा शापच! - असं वाटलं. भीमही वाटला.... पांडवांना दास्य हे शापासारखंच भासलं असावं त्या वेळी.)

- कुमार