एक चांगली लघु भयकथा वाचायला मिळाली. तिन्ही भाग आवडले.
'अंधश्रद्धा' हे नांव मात्र पटले नाही. तसेच ही कथा 'भयकथा' नसून 'मानसशास्त्रीय कथा' आहे हे लेखिकेचे स्पष्टीकरणही पटले नाही. ह्यात श्रद्धा, अंधश्रद्धा, नैसर्गिक भीती, आईची मुली बद्दलची काळजी, मुलीला आई बद्दल प्रेमापोटी वाटणारी काळजी वगैरे अनेक भावभावनांची सरमिसळ आहे. ते काहीही असले तरी कथा चांगली लिहिली आहे यात वाद नाही. (अगदी अपेक्षित शेवट असला तरीही....)
अभिनंदन.